Daan

歌手: Nihar Shembekar Shark Snehal Malgundkar • 专辑:Daan • 发布时间:2025-05-09
作词 : Dnyaneshwar Shilawane
作曲 : Nihar Shembekar/Shardul Sakhale
हे विश्वात्मक ईश्वर सदगुरु श्री भगवान
आनंदित होवोनी माझ्या वाग यज्ञानं
विश्वा अखंड यावे समृध्दीचे उधाण
द्यावे द्यावे मज हे महाप्रसादाचे दान

दान दान दान पसायदान

कुप्रवृती दुष्टातील व्हावी पुर्ण नष्ट
सत्कर्मी रमणे ही वृत्ती व्हावी धष्टपुष्ट

सर्व प्राणीमात्रात दृढ मैत्री जडो
स्वधर्मसूर्याने विश्वाला उजळो
तम जाऊनी तिन्ही लोक सुखाने नांदो
विश्वाने अखिल आदीपुरुषाला भजो
ह्या सदिच्छा पूर्ण व्हाव्या हे भगवान

जे महंत सचेतन चिंतामणीचे गाव
ईश्वरनिष्ठ करी मांगल्याचा वर्षाव
अमृताचे सागर कल्पतरूचे उद्यान
उष्णतारहित सूर्य सत्पुरुष ते महान
संत भेटू दे कलंकरहित चंद्रासमान

सजेल जो या ग्रंथानुसार आचरणाने
मिरवेल तो सुखसमृद्धीच्या विजयाने
म्हणे विश्वराव मिळेल हे प्रसादाचे दान
ज्ञानदेव सुखी जाहले मिळता हे वरदान
📥 下载LRC歌词 📄 下载TXT歌词

支持卡拉OK同步显示,可用记事本编辑